अजित पवारांच्या पीएची ओळख सांगून घातला दहा लाखांचा गंडा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 2 मार्च – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएशी माझी चांगली ओळख आहे. त्यांच्या ओळखीने महापालिकेतील मोठ्या रकमेचे टेंडर मिळवून देतो असे सांगून एका व्यक्तीला 10 लाखांना फसविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्याचा तपास सुरू आहे. या पूर्वीही पुण्यात असेच प्रकरण घडले होते. महेश पटवर्धन (रा. वारजे माळवाडी) यांची फसवणूक झाली असून, त्यांनी याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी 4 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी माझी चांगली ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन यांना सांगितले.
त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला 10 लाख रुपये दिले, पण तो काही काम करीत नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपी प्रवीण जगताप (रा. वाई, सातारा) यास अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.