गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निगडीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त निगडीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी - निगडी प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दिनांक १२ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष रामभाऊ पिसे यांनी दिली.

दिनांक १२ रोजी सकाळी ७ वा. श्रींच्या पादुका व मूर्तीवर उद्योजक अभय असलकर, योगेश निमोदिया यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक होईल.

स ७ ते दु ३ वा गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक  पारायण, ३ वा भजन, संध्याकाळी ५ ते ८ प्राधिकरणातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दिनकर पुणतांबेकर  निलेश शिंदे यांच्या हस्ते आरती होईल.

दि १३ रोजी प्रगट दिनी पहाटे ५ ते ६:३० वा काकड आरती, तसेच स.७ ते ९:३० यावेळेत सीमा यशवंत दिघे, प्रेमा गणेश हेगडे, कल्याणी रसिक पिसे यांच्या हस्ते महापूजा महाभिषेक व आरती होणार आहे.

स. ९ ते ११ गोपाळ कोकाटे आणि सहकारी भावसुमने हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. यशवंत पाटील व पुरुषोत्तम गोळे यांच्या हस्ते महाआरती होईल. दु १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद तर १ ते ३:३० या वेळेत डॉ अनघा राजवाडे व सहकारी शेगांवच्या महंता हा भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करतील.

३:३० ते ६ यावेळेत अविनाश लेले शुभांगी मुळे, मोहन पारसनीस, रवी सिधये, नरेंद्र काळे भक्तीरंग हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणाऱ आहे. संध्याकाळी ६ ते ८ या दरम्यान हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन होईल. रमेश ढमढेरे व अतुल इनामदार यांच्या हस्ते महाआरती होईल.

दि.१३ रोजी स ९ ते ६ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर होईल.

दि.१४ रोजी संध्या ४ ते ६ या वेळेत नवचैतन्य महिला भजनी मंडळ भजनसेवा देतील. देवेन्द्र पवार, रमेश हवेली यांच्या हस्ते आरती होईल.

दि. १५ रोजी संध्या 4 ते ६ गजानन महिला भजनी मंडळ, ६ ते ८ दासनवमी निमित्ताने शिल्पा केळकर हे प्रवचन देतील तर कल्पेश चवाले व हर्षल कुलकर्णी यांच्या हस्ते आरती होईल.

दि १६ रोजी संध्याकाळी ६ ते ८ गुरुदेव सेवा भजनी मंडळ खंजिरी भजन सादर करतील.

शंकर वऱ्हाडे अमृता सपाटे यांच्या हस्ते आरती होईल.

दि १७ रोजी संध्या ५ ते ७ या वेळेत वैदेही भजन मंडळ तर राम माने व भावेश सुराणा यांच्या आरती होईल.

दि १८ रोजी सकाळी ७ ते ९:३० महाशिवरात्रीनिमित्ताने महादेव कथले, कैलास कथले यांच्या हस्ते महाआरती, महाभिषेक, रुद्राभिषेक होईल.

४ ते ६ रोजी ज्ञानदिप महिला भजनी मंडळ, संध्या ६ ते ८ संगिता गुरव यांचे कीर्तन होईल तर

८:३० वा डॉ जयकुमार गुंजकर व प्रशांत सावलकर यांच्या हस्ते महाआरती होईल.