ईडी म्हणजे भाजपचे ATM मशीन ; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. 8 मार्च – संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत घेऊन भारतीय जनता पक्ष व ईडी तसेच केंद्रीय तपास यंत्रणावर आरोपांची झोड उडवली. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच ईडीच्या धाडी का पडतात असा सवालही त्यांनी केला आहे तर ईडी म्हणजे भाजपचे ATM मशीन बनले आहे असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान व ईडीकडे मी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे लेखी स्वरूपात पाठवली आहेत. पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. नोयडामधून मलबार हिलमध्ये स्थित झालेला व्यक्तीची 6 हजार कोटी संपती कशी झाली हे सांगा, असा सवाल त्यांनी कुणाचे नाव घेता केला आहे. ईडीचे चार वसुली एजंट आणि 1 किरीट सोमय्या असे 5 एजंट आहेत. ईडीचे अधिकारी 50 हजार कोटी रुपये खर्च करून उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढत आहेत. ईडीचे काही अधिकारी आणि एजंट , कार्पोरेट बिल्डर यांना धमकावत आहेत, असे आरोप संजय राऊत यांनी या वेळी केला.
दरम्यान, ईडीने आज परब राऊत आणि आदित्य ठाकरेंशी संबंधित व्यक्तींवर धाडी टाकल्या आहेत. त्याचा खासदार सुप्रिया सुळे व आदित्य ठाकरे यांनी निषेध केला आहे.