संजय राऊत 8 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत; वर्षा राऊत यांनाही समन्स
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत पीएमएलए न्यायालयाने कोठडी सुनावली होती. कोठडी संपत असल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान ईडीने विविध आकडेवारी आणि माहिती न्यायालयात सादर केली. प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असल्याचं सांगत ईडीने संजय राऊत यांना १० ऑगस्टपर्यंत कोठडी देण्याची मागणी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांच्या कोठडीत चार दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे.
ज्या बँक खात्यांद्वारे व्यवहार झाला, ती अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्रे आणि समन्स बजावलेल्या लोकांची चौकशी करण्यासाठी वेळ हवाय. त्यामुळे १० ऑगस्टपर्यंत संजय राऊतांना कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली.
सुरुवातीला १.०६ कोटी रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर १.१७ कोटी रुपये, आणि आता १.०८ कोटी रुपये पाठवण्यात आल्याचं ईडीने न्यायालयात सांगितलं. वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांच्या खात्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली, असंही ईडीने युक्तिवादावेळी सांगितलं गेलं.
दरम्यान, जमीन घोटाळा आमि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावलं आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणाचा ईडीकडून आर्थिक गैरव्यहारांच्या अंगाने तपास सुरू आहे. ईडीने या प्रकरणात ईडीने यापूर्वीही वर्षा राऊत यांची चौकशी केलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं गेलं आहे.