ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रीज कोर्स’ची आखणी व्हावी- आमदार रोहित पवार 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रीज कोर्स’ची आखणी व्हावी- आमदार रोहित पवार 
मुंबई -
करोनामुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करुन त्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मागील एका वर्षापासून करोना महामारीमुळे शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. अभ्यासाचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थांसाठी ऑनालाईन तासिकांचे आयोजन केले गेले. मात्र, इंटरनेट तसेच मोबाईल यांची व्यवस्था नसल्यामुळे मागील एका वर्षापासून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची चांगलीच पिछेहाट झाली. असर या संस्थेने दिलेला अहवाल तर चांगलाच धक्कादायक आहे. या अहवालाचा संदर्भ घेत आमदार रोहित पवार यांनी वरील मागणी केली. 

करोनाच्या काळात सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. मात्र तरीही आवश्यक साधनांअभावी या शैक्षणिक प्रवाहात राज्याच्या ग्रामीण भागातील तब्बल 10.3 टक्के मुलांना सहभागी होता आलं नाही. ‘असर 2021’ च्या अहवालात हे नमूद करण्यात आलं आहे. हे प्रमाण मोठं आहे. या मुलांना शिक्षण न मिळाल्यास भविष्यात अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळं गेल्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर ‘ब्रीज कोर्स’ची आखणी करुन त्या माध्यमातून या मुलांना मूळ शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्विटरद्वारे केली.