शपथविधी पूर्वी आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शपथविधी पूर्वी आमदारांची दिशाभूल करुन सह्या घेतल्या; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा

     मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -    कोणतीही माहिती न देता काही कागदांवर स्वाक्षरी केली असल्याचे काही आमदारांनी म्हटले असल्याचे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पक्षात झालेल्या बंडानंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जुलै रोजी तालुका अध्यक्ष, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावली असून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  हे सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचे पाटील यांनी म्हटले. अजित पवार  यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदांची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 

आजच्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी म्हटले की, अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम करत होते. त्यांनी आज बैठकही घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही भूमिका स्पष्ट करत आहोत. पक्षाच्या मान्यतेशिवाय, सत्तारुढ पक्षाकडे जाऊन काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून सांगतो की, बहुसंख्य आमदार, पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध करत आहेत. संताप व्यक्त करत आहेत असेही पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील यांनी म्हटले की,  ज्या काही आमदारांना बोलावून घेतले, त्यांनी कोणत्या कागदांवर स्वाक्षरी घेतली याची माहिती आम्हाला अद्याप समजली नाही. काही आमदारांनी दिशाभूल झाली असल्याचे म्हटले. बहुमत असतानाही सत्तारुढ पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.  9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांनी पलिकडे (सत्तारुढ पक्षाकडे) जाण्याची भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्यासोबत संपर्क साधला असल्याचा दावाही जयंत पाटील यांनी केला. 

योग्य वेळी माहिती देऊ 

आज ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यांना बरीच मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने नेमकी काय आहेत हे योग्य वेळी सांगणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. आठ जणांची काही वेगळी भूमिका होती ते सतत मांडत होते. ईडी चौकशी दरम्यान, मला निरोप आला का? तो विषय वेगळा असून मी नंतर भाष्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

अजित पवार यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या मंत्रिपदाच्या शपथेनंतर पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली. याबाबत विचारले असता जयंत पाटील यांनी म्हटले की, अजित पवारांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली नाही. पक्षाने जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत पक्षाकडून विधिमंडळाला पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.