माजी सैनिकाची 35 लाखांची फसवणूक
माजी सैनिकाची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दहा मार्च 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दिघी आणि भोसरी परिसरात घडला.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
"रेडझोन' मधील जमीन विक्रीचा प्रयत्न; दिघी येथील प्रकार
पिंपरी - "रेड झोन'मध्ये असलेली जमीन दोघांनी मिळून एका माजी सैनिकाला विकली. यामध्ये माजी सैनिकाची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दहा मार्च 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दिघी आणि भोसरी परिसरात घडला.
राजाराम लक्ष्मण ढमाले, शब्बीर इब्राहिम पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अंबाजी विठोबा चव्हाण (वय 52, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे आर्मीमधून सन 2020 साली सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या घराशेजारी असलेली राजाराम ढमाले यांची साडेतीन गुंठे जागा खरेदी करण्यासाठी चव्हाण यांनी बोलणी केली. सुरुवातीला 52 लाख 50 हजार रुपयांना व्यवहार ठरला. त्याप्रमाणे भोसरी येथे चव्हाण आणि ढमले यांनी नोटरी केली. सुरुवातीला संपूर्ण व्यवहार तीन महिन्यांत करण्याचे ठरले. त्यानुसार ढमाले यांना चव्हाण यांनी 14 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले. वेगवेगळी कारणे सांगून त्या जागेचा दोन वेळा पुरवणी करारनामा करून 52 लाख 50 हजार रुपयांवरून 47 लाख रुपयांना जागा खरेदी करण्याचे ठरले.
या संपूर्ण व्यवहारांमध्ये शब्बीर पटेल, त्यांचा मुलगा समीर शब्बीर पटेल व राजाराम ढमाले यांचा मुलगा दिग्विजय राजाराम ढमाले हे साक्षीदार म्हणून हजर होते. शब्बीर पटेल आणि ढमाले हे दोघे मिळून चव्हाण यांच्याशी व्यवहार करणार असल्याचे सांगितल्याने त्या विश्वासावर चव्हाण यांनी ढमाले यांच्याशी व्यवहार केला.
सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर ढमाले आणि पटेल यांना वेळोवेळी भेटून व्यवहार पूर्ण करण्याबाबत चव्हाण यांनी विचारणा केली. मात्र ढमाले आणि पटेल यांनी व्यवहार करण्यास टाळाटाळ करून त्या जागेचा वाद कोर्टात सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर ढमाले यांनी संबंधित जागा पटेल यांना विकसित करण्यासाठी दिली असून तुम्हाला ती जागा विकता येणार नसल्याचे सांगितले. व्यवहारासाठी दिलेले 35 लाख रुपये त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.