पुण्यात नासाच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक, ६ कोटींचा घातला गंडा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात नासाच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक, ६ कोटींचा घातला गंडा

पुणे (प्रबोधन न्यूज) - पुण्यात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही भामट्यांनी चक्क अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातला असून त्यांची ६ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. रेडियोधर्मी दुर्लक्ष धातू राईस पुलर भांड्याच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवत तब्बल १०० हून अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी राम गायकवाड (रा. अकलूज, जि. सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब नरहरी सोनवणे (वय ५०, रा. शिवपार्वती सोसायटी, सातववाडीजवळ, गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, राईस पूलर या यंत्राला मागणी असून या यंत्राच्या खरेदीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे आमिष आरोपींनी गुंतवणूकदारांना दाखवले. यासाठी पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये मार्गदर्शन कार्यक्रदेखील आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी गुंतवणूकदारांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’तील प्रतिनिधी भारतात येणार आहेत. ‘नासा’चे शास्त्रज्ञ या यंत्राचे परीक्षण करणार असून राइस पूलर यंत्रावर ते संशोधन करणार आहेत. राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी असून या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे देखील आश्वासन त्यांना देण्यात आले.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या १०० नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.