आठ वर्षाच्या मुलानं बाहुली मेली असं समजून स्वतः गळफास घेतला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 1 जून - थेरगाव येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आठ वर्षाच्या मुलाने घरात खेळत असताना बाहुलीला फाशी दिली आणि बहुलीचा जीव गेला असल्याचा समज करून त्याने स्वतः देखील गळफास घेतला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास घडली. कमल खेम साउद (वय 8, रा. सोळा नंबर बस स्टॉप, थेरगाव) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कमल रविवारी त्याच्या खोलीत बाहुलीशी खेळत होता. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती, तर वडील बाहेर गेले होते. कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून तिला फाशी दिली. त्यानंतर बाहुली मेली असं त्याला वाटलं. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज होऊन त्याने घरातील खिडकीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. कमलच्या आईने काम करत असताना त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो बाहुलीसोबत खेळत होता. काही वेळाने आईने पाहिले असता कमल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आईने कमलकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एखाद्या कैद्याला ज्याप्रमाणे फाशी देतात त्या प्रमाणे बाहुलीच्या तोंडाला कापड गुंडाळले होते. कमल हॉरर फिल्म पाहत असे, त्यातूनच त्याने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
आठ वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येनं त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या मुलाची आई गृहिणी असून वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.