‘घे भरारी’ महिला उद्योजिकांसाठीचे प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘घे भरारी’ महिला उद्योजिकांसाठीचे प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - नवव्यावसायिकांना आणि स्त्री उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी घे भरारी ने एका भव्य प्रदर्शन प्रथमच चिंचवड आकुर्डी येथे आयोजित केले आहे.

३/४/५ फेब्रुवारी २०२३ रोजी हे प्रदर्शन सिजन बॅक्वेट हॅाल मुंबई पुणे हायवे काळभोरनगर, चिंचवड येथे होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात नागरिकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असे आवाहन राहुल कुलकर्णी आणि नीलम उमराणी एदलाबादकर यांनी केले आहे.

करोना च्या काळात अनेक छोट्या व्यावसायिकांना खूपच आर्थिक फटका बसला आहे. त्यातून वर येऊन छोट्या व्यवसायिकाना एक व्यासपीठ मिळावे यासाठी घे भरारी हा ग्रुप प्रयत्नशील असतो. फेस बुक वर १ लाख ८० हजार वरून छोटे व्यावसायिक यात सामील झाले आहेत . ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने पुणे आणि देशभरातील लोक याला जोडले गेले आहेत. ह्या प्रदर्शनात 80 पेक्षा जास्त छोटे व्यावसायिक व महिलांनी भाग घेतला आहे.

उत्तमोत्तम दागिने, कपडे, परफ्युम्स, कुर्ती, पर्सेस, हातमागाच्या वस्तू, पादत्राणे, कलाकुसरीच्या वस्तू, साबणे, तांब्याच्या वस्तू, हस्तकलेच्या अनेक वस्तू, पिशव्या, टेराकोटा वस्तू, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल येथे बघायला मिळतील. त्याचप्रमाणे चमचमीत पदार्थाची मेजवानी येथे असणार आहे.

एक उत्कृष्ट वीकेंड घालवण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच उत्साहवर्धक ठरेल यात शंकाच नाही. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक त्यांच्या व्यवसायात त्यांनी मिळवलेले यश आणि त्यांच्या घे भरारीच्या साथीने झालेला प्रवास आपल्याला बघायला मिळेल. तरी असे प्रदर्शन चुकवू नये. या सर्व छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी या प्रदर्शनाला सर्वानी जरूर भेट द्यावी.