आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या 
मुंबई -

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याने ‘सुसाईड नोट’मध्ये नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत २६ वर्षीय विद्यार्थी हा मास्टरच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने कॅम्पस इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यानंतर त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.

पवई पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत विद्यार्थ्यावर नैराश्यावरील उपचार सुरू होते. आम्हाला सांगण्यात आले आहे की तो काही काळ नैराश्यात होता आणि उपचार घेत होता. त्याने त्याच्या खोलीत एक संदेश देखील सोडला आहे की त्याच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.