जनता बाळासाहेबांची छबी राज ठाकरेंमध्ये शोधते - संदीप देशपांडे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - धनुष्यबाण गेले म्हणून उद्धव ठाकरे रडत असल्याचे भास्कर जाधव म्हणाले, त्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून त्यांनी अनेक विजय आणि पराभव पाहिले; पण ते खचून कधीच रडले नाहीत. त्याचप्रमाणे राज ठाकरेसुद्धा कधीच रडले नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांची शिकवण आणि त्यांचे विचार हे फक्त राज ठाकरेंकडेच आहेत. बाळासाहेबांनी कधी सत्तेचे पद घेतले नाही. आता जनता बाळासाहेबांची छबी राज साहेबांमध्येच बघत आहेत, असेही ते म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. “निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करा, मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहात आहेत.” असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर बोलताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी “बाळासाहेब आणि राज ठाकरे यांनी आजवर अनेक पराभव पाहिले; पण ते कधी रडले नाहीत.” असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “आपल्याला निवडणुका पूर्ण ताकदीनिशी सर्व जागा लढवायच्या आहेत. काही लोक आम्हाला सहानुभूती मिळत असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. अशा खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्ही तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत बसवण्याचे काम मी करेन. मी तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत बसवेन. मी तुम्हाला सांगून स्वत: जाऊन सत्तेत बसणार नाही.” असे ते म्हणाले. त्यावर बोलताना “राज ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागले आहोत.” असे संदीप देशपांडे म्हणाले.