आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात; थोडक्यात बचावले!

मुंबई, दि. 17 मे - अहमदनगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आज पहाटे मुंबईजवळ झालेल्या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर जगताप यांच्या वाहनाची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेले वाहन असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले.

मुंबईतील कामासाठी जगताप कार्यकर्त्यांसह रात्रीच मुंबईला रवाना झाले होते. त्यांचे काही कार्यकर्ते पुढे गेले होते. जगताप त्यांच्या बीएमडब्ल्यू एक्स ५ या गाडीतून निघाले होते. गाडीत ते आणि चालक दोघेच होते. रात्रीची वेळ असल्याने आमदार जगताप झोपेत होते. मुंबईच्या जवळ गेल्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी लेन खोदून रस्ता वळवला आला. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. त्यावेळी त्या लेनमधून जगताप यांचे वाहन भरधाव वेगाने जात होते. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली.

दरम्यान, या अपघातात जगताप यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सीट बेल्ट आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे जगताप आणि त्यांच्या चालकाला दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती कळताच पोलीस मदतीला आले. मुंबईला पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्यांना मागे बोलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आमदार जगताप यांना ओळखणारे अन्य वाहनांतील नागरिकही मदतीसाठी थांबले होते. एवढ्या मोठ्या अपघतातून सुखरुप बचावल्यानंतर जगताप पुढे मुंबईला गेले. सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत तेथे भेटी गाठी आणि कामेही सुरू केली आहेत. जनतेच्या प्रेमामुळे आपण सुखरूप असून नगरच्या नागरिकांना काळजी करू नये, असंही जगताप यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील मुंबईकडे पहाटेच नगर शहरातील नागरिकांच्या कामांसंदर्भात रवाना झाले आहेत. त्यांना अपघाताची घटना समजल्यानंतर त्यांनी आ. जगताप यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आहे. ते  म्हणाले की, आ. जगताप यांच्या गाडीला झालेला अपघात दुर्दैवी आहे. ते सुदैवाने यातून वाचले. मी मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे वरून जात असताना त्यांची अपघातग्रस्त गाडी देखील पाहिली. गाडी पाहिली असता जोराची धडक झाली असल्याचे दिसते आहे. मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे त्यातून ते वाचले.

अपघाताची छायाचित्रे आणि त्यात जगताप यांच्या वाहनाची झालेली अवस्था पाहून नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात होती. अनेकांनी जगताप आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला. अनेकांचा संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे आता स्वत: आमदार जगताप यांनीच आपण सुखरूप असल्याचे कळविले आहे.