राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी सुरू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी सुरू

बारामती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची २४ तासांत दखल घेण्यात आली आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निर्देशांनुसार एक चौकशी पथक बारामती अग्रो कारखान्यावर दाखल झाले आहे. कारखान्याची पाहणी करून हे पथक अहवाल सादर करणार आहे.

मंत्री समितीने 15 ऑक्टोबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरु करण्याची शिफारस केली आहे. मात्र आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याचे गाळप त्यापूर्वीच सुरू केले, अशी तक्रार आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सोमवारी दुपारी केली होती.

परवानगी न घेता १५ ऑक्टोबरपूर्वीच ऊस गाळपासाठी साखर कारखाना सुरू केल्यास गुन्हा दाखल करण्याचा आदेश आहे. तरीही रोहित पवारांचा इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती ॲग्रो लिमिटेड कारखाना सुरू करण्यात आल्याची तक्रार भाजप आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देत केली आहे.

बारामती ॲग्रो लिमिटेड साखर कारखाना १० ऑक्टोबरला सुरू करून आमदार रोहित पवारांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. पुणे विभागातील जे सहकारी आणि खासगी साखर कारखानदार १५ ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू करतील, त्या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकावर तसेच जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पारित केला होता.

ऑक्टोबर महिना हा पावसाचा महिना असल्याने उसाच्या फडातून वाहनाद्वारे ऊस काढणे तसेच अन्य अडचणीचा सामना करावा लागतो. उसाची रिकव्हरीही व्यवस्थित बसत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. उसाच्या सरीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने आणि तो ऊस गाळपासाठी तोडला तर उसाच्या पेऱ्यात पाण्याचे प्रमाण जादा असते. त्यामुळे नुकसानीची बाजू ज्यादा होते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपूर्वी परवानगी न घेता साखर कारखाने सुरू करू नयेत, असे आदेश देण्यात आले होते. तरीही रोहित पवारांनी कारखाना सुरू केला असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

शेखर गायकवाड यांच्या निर्देशांनुसार कारखान्याच्या पाहणीसाठी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयातील एक पथक कारखानाच्या कार्यस्थळावर दाखल झाले आहे. हे पथक कारखाना आवारातपाहणी करुन अहवाल साखर आयुक्तांना सादर करणार आहेत. दरम्यान, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी साखर कारखान्यावर आले असता कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब गुळवे यांनी मध्यम प्रतिनिधींना कारखान्याच्या आवारातील परिस्थिती दाखवून दिली. सध्या कारखान्याची गव्हाण बंद असल्याचे दिसून आले. मात्र, याबाबतचे चित्रीकरण करण्यास कारखाना प्रशासनाने सहमती दिली नाही.