पुण्यात 24 तासांत 3 खून, पुणे हादरले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात 24 तासांत 3 खून, पुणे हादरले

पुणे, (प्रबोधन न्यूज) - पुण्यामध्ये 24 तासांमध्ये तब्बल 3 खून झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. वडगाव बुद्रुक परिसरात प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती. मैत्रिणीसोबत बोलत बसलेला असताना हल्लेखोरांनी मृत नागेश चिंचोळे 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली आणि रोपट्याची कुंडी घालून संपवलं होतं. या हल्ल्यामध्ये नागेशचा जाग्यावरच मृत्यु झाला होता.

डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदीपात्रामध्ये खून करून तरूणाचा मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुरेश कदम (35, रा. शनिवारपेठ, पुणे) असं खून झालेल्याचं नाव आहे. गणेश कदम हा लाँन्ड्री चालक होता. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खून करण्यात आला होता.  

हडपसर भागात रिक्षाचालकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर राहुल गायकवाड (वय २४, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ, हडपसर) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

या प्रकरणी कृष्णा विठ्ठल रेखले (वय २७, रा. कवडीपाट टोल नाका, लोणी काळभोर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षदा प्रतीक वाघमारे (वय २२, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) हिने या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि रेखले रिक्षाचालक आहेत. रविवारी सकाळी लोणी काळभोर परिसरात दोघांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर रेखलेने गायकवाडला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. नारळाच्या बागेजवळ त्याला दांडक्याने बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला.