मोटारसायकलींची चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद, १७ मोटारसायकली हस्तगत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मोटारसायकलींची चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद, १७ मोटारसायकली हस्तगत

पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ची धडाकेबाज कारवाई

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मोटारसायकलींची चोरी करून ती परिचयाच्या लोकांना विकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस पोलिसांनी नुकतेच पकडले आहे. त्यांच्याकडून एकूण १७ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीस आळा घालण्याचे दृष्टीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या सूचनेस अनुसरून गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस पथकाने आरोपींचा माग काढून चाकण चौक येथे सापळा लावून थांबले असता एका मोटार सायकलवरून तीन इसम संशयीतरित्या खेडकडून येत असताना दिसून आले. पोलीसांना पाहून ते पळून जात असताना सचिन मोरे व प्रमोद गर्जे यांनी त्याचा एक किलो मीटर पाठलाग करून शिताफ़िने पकडले.

त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे प्रज्वल प्रताप देशमुख, (वय २० वर्षे, रा. वरवटे मळा, जवळेकडलग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अक्षय लहानु जाधव, (वय २७ वर्षे, रा. न्यु तांबे हॉस्पीटल समोर, बटवाल मळा, संगमनेर ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे सांगितले. त्याचेकडे चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना युनिट १ कार्यालयात आणून सखोल चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात असलेली मोटार सायकल ही त्यांनी म्हाळुंगे, चाकण परिसरातून चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना वाहन चोरीच्या  गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली.

आरोपी यांची पोलीस कस्टडी घेऊन तपास करता त्यांनी त्यांचा संगमनेर येथील साथीदार तुषार फटांगरे, (रा. संगमनेर, जि. अहमदनगर) व एक अल्पवयीन साथीदारासह पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नाशिक या परिसरातून मोटारसायकली चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पाथर्डी, अकोले येथे त्यांचे ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे सखोल तपासामध्ये उघड झाले. त्यानुसार त्यांचा साथीदार तुषार भारत फटांगरे, (वय २१ वर्षे, रा.मु.पो.पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यास संगमनेर परिसरातून ताब्यात घेऊन त्यासही दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

पोलीस कोठडी दरम्यान आरोपी हे संगमनेर येथे मोटार सायकलीवरून पुणे नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर, नारायणगाव, आळेफ़ाटा व नाशिक परिसरात येऊन मोटार सायकलची चोरी करून रातोरात परत जात असे व चोरलेल्या मोटार सायकली या परिचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे अश्वासन देऊन विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना विकलेल्या एकूण ९ लाख ४५ हजार रुपयांच्या १७ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे, सचिन मोरे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, गणेश महाडीक, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, जावेद पठाण, विशाल भोईर, बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, उमाकांत सरवदे, मारुती जायभाये, अजित रूपनवर, प्रमोद हिरळकार, स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली आहे.