बांधकाम व्यावसायिकाकडे 9 कोटीची खंडणी मागणाऱ्यास अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 29 मे – बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल सव्वा नऊ कोटीची खंडणीची मागणी करून त्यातील २ कोटींचा धनादेश स्वीकारताना एका ठगास खंडणी आणि गुंडा विरोधी पथकाने डांगे चौक येथून शुक्रवारी (ता.२७) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.
आदिनाथ बी. कुचनुर (रा. डांगे चौक) असे अटक करण्यात आलेल्या ठगाचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक केतूल भागचंद सोनिगरा (वय-४१, रा.प्राधिकरण, निगडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिगरा हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची चिंचवडमधील डांगे चौकाजवळ सिग्नेचर पार्क नावाने बांधकाम साईट सुरू आहे. आरोपी कुचनुर याने बांधकाम व्यावसायिक सोनिगरा यांना फोन करून बांधकामात खूप त्रुटी आहेत, असे सांगितले. तसेच, सोनिगरा यांच्या बांधकामा विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिबुनलकडे खोटे अहवाल सादर करून अडचणीत आणण्याची धमकी दिली. तसेच आरोपी कुचनुर याने सोनिगरा यांच्याकडे तब्बल सव्वानऊ कोटींची खंडणी मागितली. याप्रकरणी सोनिगरा यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
खंडणी व गुंडा विरोधी पथकाने सोनिगरा यांच्या कार्यालयामध्ये साध्या वेशात सापळा रचला आणि आरोपी कुचनुरला खंडणीची रक्कम नेण्यास बोलाविले. आरोपी कुचनुर कार्यालयात आल्यानंतर सोनिगरा यांनी ठरलेल्या रकमेपैकी दोन कोटींचा धनादेश दिला. आरोपी कुचनुरने धनादेश हातात घेताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, आरोपी आदिनाथ कुचनुर याने बांधकाम व्यावसायिकांना तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांना धमकावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला शनिवारी (ता. २८) मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, शाम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके आणि तौसिफ शेख यांच्या पथकाने केली आहे.