पवना धरणातील पाणीसाठा पोहोचला 65 टक्क्यांवर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पवना धरणातील पाणीसाठा पोहोचला 65 टक्क्यांवर

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी – चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पाऊस सुरूच आहे. मागील चोवीस तासात 20 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात जमा होणारे पाणी सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2.44 टक्क्यांनी वाढला असून धरणात एकूण 65.35 टक्के पाणीसाठा आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत– पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.

पवना धरणातील परिस्थिती !

  • गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 20 मि.मि.
  • 1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 393 मि.मि.
  • गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 673 मि.मि.
  • धरणातील सध्याचा पाणीसाठा = 65.35 टक्के
  • गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 36.41 टक्के
  • गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 2.44 टक्के
  • 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 48.51 टक्के