तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चार जणांचा मृत्यू तर सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चार जणांचा मृत्यू तर सीडीएस बिपीन रावत गंभीर जखमी

चेन्नई -

तामिळनाडूत कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, पायलट व एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या दुर्घनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. सर्व जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. इतरांचा शोध घेण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी चौघांचे मृतदेह सापडल्यांच सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.

० हेलिकॉप्टरमध्ये 'हे' लोक प्रवास करत होते 
. सीडीएस बिपीन रावत
. मधुलिका रावत
. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
. लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
. गुरुसेवक सिंग
. जितेंद्र कुमार
. विवेक कुमार
. बी. साई तेजा
. हवालदार सतपाल

० देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत 
डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.