सिम्बॉयसिस विद्यापीठ आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सिम्बॉयसिस विद्यापीठ आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी, - शहरातील होतकरु न गुणवंत विद्यार्थ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वर्ल्ड ऑफ वर्क उपक्रमांतर्गत लाईट हाऊस आणि सिम्बॉयसिस स्कील्स ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीमधील आयुक्त कक्षात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरीक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त अजय चारठाणकर, सिंबायोसिस स्किल्स ऍन्ड प्रोफेशनल युनिवर्सिटीच्या प्राचार्य डॉ. स्वाती मुजुमदार, गौरी शिवरकर, लाईट हाउसच्या संचालक रुची माथूर आदी उपस्थित होते. ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क प्रोग्राम हा जागतिक पातळीवर युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनद्वारे चालवला जातो. त्याचा विस्तार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये केला जात आहे. 6 जून 2023 रोजी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पुढील 5 वर्षामध्ये शहरामध्ये वर्ल्ड ऑफ वर्क सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रकल्पांतर्गत महापालिका पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

वर्ल्ड ऑफ वर्क हा कार्यक्रम युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तयार केला आहे. ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचा हा मुख्य प्रकल्प आहे. प्रकल्पाद्वारे हजारो तरुणांना भौतिक करिअर मार्गदर्शन केंद्रे, हेल्पलाइन, यूथ कनेक्‍ट डिजिटल प्लॅटफॉर्म मार्फत व्यवसायीक संधी उपलब्ध करून देण्यासाठी तयार केला आहे. कार्यक्रमाची रचना आणि आराखडा शहरामध्ये उपजीविका साक्षरता प्रस्थापित करण्यावर केंद्रित आहे. अशा प्रकारे कमी उत्पन्न असलेल्या समुदायांमध्ये राहणाऱ्या 18 ते 35 वयोगटातील तरुणांसाठी कौशल्य, नोकरी आणि मार्गदर्शन मिळविण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम तरुणांना त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी, लघु व्यवसाय स्थापित करण्यासाठी देखील मदत करणार आहे.

सिम्बॉयसिस स्कील्स ऍण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने शहरातील होतकरू आणि गुणवंत अशा 55 मुलींना दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका अर्थसहाय्य करणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात शहरात 16 केंद्रे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती अजय चारठाणकर, उपायुक्त, समाज विकास विभाग यांनी दिली.