शिवसेनेचे १४ खासदार एकनाथ शिंदेच्या गटात ?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

शिवसेनेचे १४ खासदार एकनाथ शिंदेच्या गटात ?

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक घेतली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बैठकीत शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी १४ खासदारांची उपस्थिती होती. हे सगळे खासदार ऑनलाइन या बैठकीत उपस्थित होते ही माहिती समजली आहे. तसंच आजच्या बैठकीत शिंदे गट ठराव मांडून करणार कार्यकारिणीची घोषणा करणार आहेत.

शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार हे एकनाथ शिंदेंच्या सोबत आधीच गेले आहेत. अशात आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १४ जण या बैठकीत होते त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटात हे खासदारही येणार हे जवळपास नक्की झालंय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा एकनाथ शिंदे करणार असल्याचं समजतंय. एकनाथ शिंदे आता पक्ष ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत, हे स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही खासदार राहुल शेवाळे यांनी आपण या बैठकीत नव्हतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे.  धैर्यशील माने आणि संजय मंडलिक शिंदे गटात सामील होणार आहे. लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील मेळाव्याला दोघांनाही दांडी मारली होती.

तर दुसरीकडे, शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले आहे, अशी टीकाही कदम यांनी केली आहे.

दरम्यान, आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही फोडण्यासाठी दिल्लीतून कुटील डाव रचला जात असल्याची कबुलीच खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. शिवसेना फोडण्याचे षडयंत्र दिल्लीतून रचले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी हे आरोप केले आहेत. प्रत्येकाच्या कारवायांबाबत आमच्याकडे माहिती आहे. कोण कुठे जातो, कोण कुणाला भेटतो हे माहिती आहे. काही जणांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिली आहेत. आमचा नाईलाज आहे, आम्हाला ओढलं जातंय. आमच्यावर दबाव आहे, असं या खासदारांचं म्हणणं आहे. काहींनी मेसेज पाठवले आहेत, असं राऊतांनी सांगितलं.

खासदारांवर चौकशीचा, ईडीचा, आयटीचा दबाव टाकले जात आहेत, हे सत्य आहे. पन्नास खोके तर आमदारांपर्यंत चालले होते. तर खासदारांसाठी आणकी दहा खोक्यांचा भाव वाढल्याचे कानावर आले आहे. खासदारांना अमिष दाखवले जात आहे. सर्व खासदारांना आम्ही व्हीप बजावलेला आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, त्यामुळे कुणावरही आजतरी संशय नाही, असंही राऊत म्हणाले.

संसदेच्या अधिवेशनात कट शिजतोय, अशा बातम्या ऐकायला येत आहेत. काही खासदारांशी चर्चा झाली आहे. आजही तीन खासदारांशी चर्चा झाली. कोणत्या ना कोणत्या छोट्या मुद्यावर पकडायचं आणि दबाव टाकायचा, हे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत फुट पाडायची आणि उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव आहे. काही जण त्याला दुर्दैवाने बळी पडतात, असं राऊतांनी स्पष्ट केलं.