श्रद्धा कपूरच्या भावाला ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बंगळुरू, (प्रबोधन न्यूज) - बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धांत कपूरला बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धांतवर पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. एमजी रोडवर असलेल्या हॉटेल पार्कच्या पबमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर बेंगळुरू पोलिसांनी छापा टाकला होता. या पार्टीत सिद्धांतला डीजे म्हणून बोलावण्यात आले. पार्टीमध्ये सिद्धांतसह ६ जण ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याच वेळी, या प्रकरणी त्याच्या वडिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो की ते शक्य नाही'. अभिनेता शक्ती कपूर यांचा सिद्धांत मुलगा आहे.
बेंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ भीमाशंकर म्हणाले की, या प्रकरणी हे सर्वजण ड्रग्ज घेऊन पार्टीला आले होते की हॉटेलमध्ये ड्रग्ज नेण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व आरोपींना उलसूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशी यादीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. मात्र, त्याच्याविरुद्ध ठोस काहीही सिद्ध होऊ शकले नाही. श्रध्दा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे सप्टेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसल्यावर त्यांना चौकशी करण्यात आली.
सिद्धांत कपूर हा बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा आहे. 1997 मध्ये आलेल्या जुडवा या चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. सिद्धांतने अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भाऊकाल या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.