पहाटेचे सरकार पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा – विखे पाटील

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पहाटेचे सरकार पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा – विखे पाटील

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - राज्यसभा निवडणुकीत भाजपने मोठी रणनीती आखून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. हाती आलेल्या अनपेक्षित निकालामुळे महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष एकमेकांकडे आता संशयाच्या नजरेने बघत आहेत. अशातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका कार्यक्रमाच्या मुलाखतीत मोठे विधान केले. या मुलाखतीत त्यांनी तोंडावर आलेली विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपने खेचून आणलेल्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा व्यक्त करून एका विधानाने महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे. राज्यातील विविध समाजघटकांच्या हितासाठी अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे. आणि देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणावे, असे मोठे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ते म्हणाले, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि कडक भूमिका घेणारे नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि दिलेले शब्द पूर्ण करणारे आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत. परंतु त्यांनी चुकीच्या लोकांचा सल्ला न घेता सर्वात आधी त्या सल्लागारांना बाजूला करावे. यापुढे मला विरोधी पक्षनेता नव्हे, तर मंत्री होणे आवडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आणि योग्यच होता. वडील सल्ला देण्यासाठी नसताना मी घेतलेला तो पहिलाच मोठा राजकीय निर्णय होता, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी संयम बाळगावा, असा माझा त्यांना सल्ला आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना आपण कुठलाही सल्ला देऊ इच्छित नाही, असा टोलाही त्यांनी थोरातांना लगावला.