शिवसेना शहरभर राबवणार जनजागृती अभियान - सचिन भोसले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
शिवसेना करणार भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. करदात्या नागरिकांना सेवासुविधा देण्याविषयी महानगर पालिकेतील अधिकारी प्रशासनाला हाताला धरून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी प्रशासन आणि ठेकेदाराशी संगनमत करून नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. मागील पाच वर्षातील हा भ्रष्टाचार शहरात गल्लोगल्ली जाऊन नागरिकांपुढे शिवसेनेच्या वतीने मांडण्यात येणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड शहर शिवसेना अध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व भागात जनजागृती रथ फिरवून जनजागृती करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले यांनी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाची भ्रष्टाचारी सत्ता घालवण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी एकत्र यावे अशी भूमिका शिवसेनेचे आहे परंतु याविषयी अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्थानिक निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात यासाठी अनुकूल आहेत असे प्रतिपादन शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक उपनेते गोविंद घोळवे यांनी पिंपरी येथे केले. पिंपरी चिंचवड शिवसेनेचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्य संघटक गोविंद घोळवे बोलत होते.
या पत्रकार परिषदेस शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शहर प्रसिद्धीप्रमुख भाविक देशमुख, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, राजेश वाबळे, विधानसभा संघटिका अनिता सुतारे, शहर संघटक रोमी संधू, विशाल यादव, तुषार सहाने, तालुका संघटक दिनकर मिश्रा, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, कुणाल तापकीर, सुरेश राक्षे, हरीश नकाते, सुधाकर नलावडे, सोमनाथ गुजर, अनिल सोमवंशी, अमोल निकम, नवनाथ तरस, विधानसभा संघटक सचिन सानप, रावसाहेब थोरात, दिलीप भोंडवे, विजय साने, महेश कलाल, समन्वयक पार्थ गुरव, दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख गोरख पाटील, प्रदीप दळवी, गोरख नवघणे, संतोष वाळके, अनिल पारच्या, चंद्रकांत शिंदे, दिलीप पाटील, दिलीप दंडवते, चेतन शिंदे, दीपक कांबळे, सोमनाथ गुजर, प्रशांत कडलगे, सोमनाथ गुजर, किरण दळवी, संदीप भालके, नितीन दर्शन, शिवाजीराव पाटील, नितीन बोंडे, संतोष तरस, सय्यद पटेल उपविभाग प्रमुख जयराम लांडगे, नितीन घोलप, राजू भालेकर, शंकर देसले, मनोज पराडे, विभाग संघटक शिवाजी कुराडकर, अमित दर्शले, सुनील बाठे, सचिन सांडभोर, सहदेव औसरमल, विजय दर्शले, गजानन धावडे, जितेंद्र शिगवण, माजी नगरसेवक संजय दुर्गुळे, प्रतीक झुंबरे, महिला उपशहर संघटिका मंगला भोकरे, ज्योती गायकवाड, शारदा वाघमोडे, मंदार कड, शिल्पा अनपण, कोमल जाधव, गौरी घंटे, साधना काशीद, रजनी वाघ, वैशाली कुलथे, अश्विनी खंडेराव, अनिता तळेकर, सुजाता तांबे, बेबी सय्यद आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले की, शहर शिवसेनेच्या वतीने भाजपाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी एक चित्रफित बनवण्यात आली आहे ही चित्रफित शुक्रवार दि.१० जून ते शनिवार दि.२५ जून पर्यंत संपूर्ण शहरभर जनजागृती रथावर दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत शहरातील चौकाचौकात प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच या अभियानाचा समारोप रविवार दि. २६ जून रोजी शिवसेनेच्या भव्य सभेने करण्यात येणार आहे. या चित्रफिती मध्ये महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना २४ तास मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने अमृत जल योजना जाहीर केली या अमृतजल योजनेचे कोट्यवधी रुपयांची कामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहर व रस्ते खोदून केली. परंतु अद्यापही ही अमृत योजना पूर्ण झाली नाही. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी देऊ असे आश्वासन भाजपच्या वतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. पाणीपुरवठ्याची सर्व आश्वासने फोल ठरली आहेत अशी टीका भोसले यांनी केली आहे. तसेच शहराला प्रामुख्याने कचऱ्याची समस्या भेडसावत आहे याविषयी देखील लोकप्रतिनिधींमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. जून महिना उजाडला तरी नाला सफाईचे काम पूर्ण झाले नाही आता पाऊस सुरू झाला की, नाल्यातील गाळ, कचरा वाहून जाणार आणि नेहमी प्रमाणे प्रशासन ठेकेदाराला पैसे देऊन मोकळे होणार हा दरवर्षीचा प्रकार आहे. नदी पात्रातील जलपर्णी काढण्याबाबत देखील असाच अनुभव आहे. तसेच कोरोना काळात महानगरपालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून मानवतेला काळीमा फासनारे कृत्य केले आहे. यामध्ये स्पर्श हॉस्पिटल घोटाळ्याबाबत शिवसेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. यामध्ये कोरोना झालेल्या एका रुग्णास आयसीयूमध्ये बेड मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपये संबंधित डॉक्टरांनी व मधल्या दलालांनी घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबतही शिवसेनेने भाजपला जाब विचारला होता. कोरोना काळात शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणे बाबत देखील भाजपने भ्रष्टाचार केला. कोरोना काळात सर्वत्र उद्योग व्यवसाय ठप्प असताना महिलांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली महिलांच्या प्रशिक्षण शिबिराच्या कामात देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार भाजपाने केला. चिखली येथे उभारण्यात येणाऱ्या संतपिठामध्ये घोटाळा, नदी सुधार योजनेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटी योजनेतील हजारो कोटींचा घोटाळा असे विविध घोटाळे नागरिकांनी पुढे चित्रफितीद्वारे मांडून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शहरभर घरोघरी जाऊन जन जागृती अभियान राबविणार आहेत. आता महानगरपालिकेतून भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय थांबायचे नाही असा निर्धार सर्व शिवसैनिकांनी केला आहे.