हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात – संजय राऊत

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात – संजय राऊत

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रातील 6 राज्यसभा जागांसाठीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपने 3 जागा, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. या निकालावरून आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून राज्यात भाजपने घोडेबाजार भरवल्याची टीका केली आहे.

काही घोडे बाजारात असतात, हे घोडे हरभरे टाकल्यावर कुठेही जातात, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्षांवर टीका केली आहे. ते म्हणाले की,  जास्त बोली लागली किंवा इतर काही कारणे असतील, त्यामुळे 6 मते आम्हाला मिळाली नाहीत. असे लोकं कुणाचेही नसतात.

संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलो नाही, आम्ही व्यापार केला नाही, तरीही आम्हाला 33 मते मिळाली यातच आमचा विजय आहे. अर्थात ज्यांनी आम्हाला मतं दिली नाहीत, त्यांची आमच्याकडे नावं आहेत, एवढंच मी सांगेन, असा इशाराही राऊतांनी दिला. हितेंद्र ठाकूरांची 3 मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारांसमोर सांगितले.

राऊत पुढे म्हणाले की, कुठे ईडी, कुठे सीबीआय वापरली जाते, आणि कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरली जाते का, अशा प्रकारची शंका आता येऊ लागली आहे. त्यांनी फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला असं नाही. 33 मते पहिल्या पसंतीची मते आम्हाला, तर 27 पहिल्या पसंतीची मते महाडिकांना मिळाली. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. पण निवडणूक प्रक्रियेत पहिल्या-दुसऱ्या पसंतीच्या मतांवरून गणित ठरत असते.