A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे (प्रबोधन न्यूज ) - दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे , बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. याच आंदोलन चा भाग म्हणून पिंपरी चिंचवड शहरात डांगे चौक येथे आज आपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने आंदोलन केले.
आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंच ने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे आप उपाध्यक्ष संतोष इंगळे यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप आप युवा अध्यक्ष रविराज काळे यांनी केला.
आता च्या परिस्थिती नुसार आणि अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.
सुप्रीम कोर्टाने आप सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही ह्या अध्यादेशाच्या मार्गे बदली, नियुक्ती चे अधिकार मोदी सरकारने आपल्याकडे घेतले आहेत , भाजप च्या केंद्र सरकार विरोधात निषेध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त गेला. याप्रसंगी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, उपाध्यक्ष, संतोष इंगळे, युवा अध्यक्ष रविराज काळे, अनुसूचित जाती आघाडी प्रमुख यशवंत कांबळे, सचिव अमर डोंगरे, प्रवक्ता राज चाकणे, क्रीडा आघाडी प्रमुख चंद्रमणी जावळे, शेतकरी आघाडी प्रमुख वाजिद शेख, साहेबराव देसले,गोविंद माळी, शुभम यादव, प्रकाश हगवणे, अभिजित सूर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, संजय मोरे, स्वप्निल जेवळे, कल्याणी राऊत, दमयंती नेरेकर, सुरेश भिसे, इम्रान खान, ऋषिकेंश कानवटे, सकट दादा व इतर कार्यकर्ते निषेध आंदोलनात सामील होते..