संस्थेच्या प्रगतीसाठी एकोपा महत्त्वाचा : अर्जुन घोळवे
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
- मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मेळावा
- वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन, सचिव संजय पटनी यांची माहिती
पिंपरी (प्रबोधन न्यूज) - एखादी संस्था यशस्वी कधी होते, तर त्यामध्ये ऐकी असावी लागले… एकीच्या बळातून संस्थेच्या यशाचा पाया रचला जातो. सुरेश मोहीते यांच्या संकल्पनेतून हा पाया रोवला गेला. त्याच भक्कम आधारावर वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा प्रमुख म्हणून काम पाहताना मला विशेष समाधान वाटते, असे मत मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अर्जुन घोळवे यांनी व्यक्त केले.
मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने संस्थेचे ‘गेट टूगेदर’नुकतेच पार पडले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष बालाजी अय्यर, परेश वडके, कमल वनवारी, विजय नाईक, प्रदीप गाडे, शंकर घोलप, सुधीर पठारे, राकेश भसीन, युनायटेड पेरिफेरल्स चे सुनील गुगळे, इशा एंटरप्राईझेसचे राहुल मुथ्था, जे.एस. एंटरप्राईझेसचे मनोहर रजवाणी आदी उपस्थित होते.
अर्जुन घोळवे म्हणाले की, कॉम्पुटर्स खरेदी- विक्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिक, डिलर्संना संघटीत करुन त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी मावळ असोसिएशन ऑफ इन्फोर्मोशन टेक्नॉलॉजी… या संस्थेची स्थापना झाली. सुरेश मोहीते यांना हे असंघटीत लोकांसाठी लावलेले रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. या वटवृक्षाच्या सावलीत आपण सर्व व्यावसायिक निश्चितपणे व्यावसायिक प्रगती करीत आहोत, यात शंका नाही. कोविड आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांत संस्थेच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रमांची परंपरा खंडित झाली. मात्र, आता कोविडचे सावट दूर झाले आहे. व्यावसायिक अडचणींवर मात करीत आपण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेणार आहोत.
सचिव संजय पटनी म्हणाले की, कोविड…कोविड… अशी भिती निर्माण न करता आपण आता त्यावर मात करुन पुढे जायला शिकले पाहिजे. कोविडच्या महामारीमध्ये अनेक कटू अनुभव प्रत्येकाला आले. कौटुंबिक असेल किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना करावा लागला. प्रत्येकाने संघर्षमय भूमिका ठेवून वाटचाल कायम ठेवली. या संकटातून आपण सावरलो आहोत. व्यावसायिक वाटचाल भक्कमपणे आपण निश्चितपणे यशस्वी करणार आहोत, यात शंका नाही. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. यापुढील काळात आपण संस्थेच्या वतीने वृक्षारोपण, हेल्थ चेकअप, समाजातील गरजुंना मदत, पिकनिक ट्रीप, फॅमिली शो, एक्स्पो , टेक्निकल सेमीनार आदी उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मोहीते यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, संस्थेच्या यशस्वी वाटचालीबाबत समाधानही व्यक्त केले.