राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे व रामराजे नाईक निंबाळकर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे व रामराजे नाईक निंबाळकर

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावांचा समावेश आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र, त्याच दरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचंही बोललं जाऊ लागलं. त्यामुळे खडसेंना संधी मिळणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राजकीय वनवास संपला आहे.