अखेर १८ दिवसांनी नितेश राणे आले समोर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
सिंधुदुर्ग -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून ते अज्ञातवासात होते. ते नेमके कुठे आहेत याची कोणालाही माहिती नव्हती. दरम्यान नितेश राणे हेच या प्राणघातक हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र आता १८ दिवसांनी नितेश राणे माध्यमांसमोर आले.
सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीवरुनच झालेल्या संतोष परब मारहाण प्रकरणी नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. यानंतर नितेश राणे अज्ञातवासात होते. पण आज कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केलं. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंत शुक्रवारी पुढील सुनावणी होईल असं सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत नितेश राणे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही अशी हमी राज्य सरकारने यावेळी न्यायालयात दिली होती. दरम्यान याप्रकरणी उच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार असून तोपर्यंत कठोर कारवाईपासूनचा दिलासा कायम आहे.
विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात आहे. तसेच खोटय़ा प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा नितेश यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेत केला आहे.
तक्रारदाराचे नितेश यांच्यासोबत शत्रुत्व असल्याचा प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) कोणताही उल्लेख नाही, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, नितेश हेच परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामागे असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. भीती निर्माण करण्याच्या हेतूने हा हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात नितेश यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना केला होता. अन्य आरोपींसोबतची नितेश यांची छायाचित्रेही पोलिसांनी सत्र न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली होती. अटक आरोपींची पृष्टी करण्याच्या दृष्टीने नितेश यांचा या आर्थिक किंवा राजकीय गुन्ह्यातील सहभाग शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यकता असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन आणि पोलिसांचे म्हणणे मान्य करत सत्र न्यायालयाने नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.