देशात 5G सेवेचा शुभारंभ; पुण्यासह निवडक शहरात सुविधा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन
नवी दिल्ली, (प्रबोधन वृत्तसेवा) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. यावेळी संबोधित करताना त्यांनी 5G चे फायदे आणि ही सेवा भारतात कशा प्रकारे क्रांती घडवून आणेल, यावर भाष्य केले. तसेच आजच्या तारखीची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांत होईल, असेही ते म्हणाले.
भारत देखील आता जगातील निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, जिथे 5G सेवा अस्तित्वात आहे. दिल्लीतून 5G सेवा सुरू झाली आहे. पण, दिल्लीसोबतच १३ शहरांमध्ये 5G सेवा एकाच वेळी सुरू होणार आहे. इंडियन मोबाईल काँग्रेस ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. भविष्यातील 5G भारत या कार्यक्रमात दिसेल.
Airtel 5G आणि Jio भारतात 5G सेवा देणारे पहिले असतील. २०२२ च्या अखेरीस सर्व प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा प्रदान करेल असा Jio चा दावा आहे. तर 2023 पर्यंत देशभरात 5G सेवा सुरू होईल. 5G ची किंमत 4G पेक्षा २० ते २५ टक्के जास्त असेल. तर, वेग १० पट जास्त असेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमात सांगितले की, 5G ही डिजिटल कामधेनू आहे. हे तंत्रज्ञान भारतीयांच्या जीवनात आरोग्य, संपत्ती आणि आनंद आणेल. त्यामुळे स्वस्त दरात आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे. अंबानी म्हणाले की, जिओच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा पोहोचवली जाईल.
पंतप्रधान मोदींनी 5G च्या वापराचा घेतला अनुभव
1) जिओने आपल्या डेमोमध्ये 4 शाळा एकत्र जोडल्या. मुंबईतील एका शाळेतील शिक्षकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरील विद्यार्थ्यांना शिकवले. अहमदाबादमधील रोपरा प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीशी पंतप्रधानांनी संवाद साधला.
2) व्होडाफोन आयडियाने 5G च्या सहाय्याने दिल्ली मेट्रोच्या बांधकामाधीन बोगद्यामध्ये कामगारांच्या सुरक्षेच्या वापराचे प्रकरण प्रदर्शित केले. बोगद्यात काम करणाऱ्या लोकांशीही पीएम मोदींनी चर्चा केली.
3) एअरटेलने आपल्या डेमोमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांचा समावेश केला. विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या मदतीने सौर यंत्रणेबद्दल शिकवण्यात आले. स्टुडंट होलोग्रामच्या माध्यमातून ते स्टेजवर दिसले आणि त्यांचा शिकण्याचा अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर केला.