व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधा, अजित पवारांचे आवाहन

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

व्हिडिओमागचा मास्टरमाइंड शोधा, अजित पवारांचे आवाहन

मुंबई - शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाइंड शोधून काढावा असे आवाहन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनातही पाहायला मिळाले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातील सूत्रधाराला शोधून कठोर शिक्षा देण्याचीही मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापलेलं आहे.

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताना म्हणाले की, एखाद्या लोकप्रतिनिधीनं काहीही केलेलं नसताना कुणी जाणिवपूर्वक त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला का?, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल तर त्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 'दूध का दूध, पाणी का पाणी' झालं पाहिजे. या प्रकरणातील वस्तूस्थिती लोकांना आणि सभागृहाला कळायलाच हवं, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राजकारणासह इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना स्वत:चं चारित्र्य स्वच्छ ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण राज्यातील लोक आपल्याकडे पब्लिक फिगर म्हणून पाहत असतात. एखाद्याची राजकीय मतं किंवा विचार वेगळे असू शकतात, त्याबद्दल खोलात जायचं कारण नाही. परंतु या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचंही अजित पवार यांनी सभागृहात बोलताना म्हटलं आहे.