तृतीय पंथीयांनी घेतला ‘ट्रान्स कुक’ कुकरी स्पर्धेत भाग

तृतीय पंथीयांनी घेतला ‘ट्रान्स कुक’ कुकरी स्पर्धेत भाग
तृतीय पंथीयांनी घेतला ‘ट्रान्स कुक’ कुकरी स्पर्धेत भाग
तृतीय पंथीयांनी घेतला ‘ट्रान्स कुक’ कुकरी स्पर्धेत भाग

पुणे, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच पुण्यात 'ट्रान्स कुक' नावाने तृतीय पंथीयांसाठी कुकरी कॉम्पिटिशन सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली आहे. विष्णुजी की रसोई, एरंडवणा पुणे येथे ही स्पर्धा घेण्यात आली. आंतराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर यांच्यामार्फत ही स्पर्धा घेण्यात आली. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा पाच शहरातून ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक शहरातून किमान दोन किंवा अधिक तृतीय पंथीयांची निवड करण्यात येईल आणि अंतिम फेरी नागपूर येथे 14/15 जून 2022 ला होणार आहे. प्रथम पारितोषिक रोख रकमेचे असून, सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

या प्रसंगी मान्यवर विष्णु मनोहर यांच्या सोबत, अमृता पटवा, सुजाता नागपूरे, यश सातपुते आणि तृतीयपंथी महिला कादंबरी उपस्थित होत्या. तृतीयपंथीयांचा आवाज ओळखल्या जाणाऱ्या तृतीयपंथी महिला कादंबरी यांची या कार्यक्रमासाठी मोलाची साथ लाभली. पुण्यातून प्राथमिक फेरी घेण्यात आली. त्यात सुमारे 20 तृतीयपंथी स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी स्पर्धकांनी घरून बनवून आणलेल्या पदार्थांचे परीक्षण विष्णु मनोहर तसेच त्यांचा टीमने केले. या स्पर्धेनंतर सात तृतीयपंथीयांची निवड करण्यात आली आहे. इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हरघर रोजगारच्या शिल्पा देसाई, MIST ऑर्गनायझेशनचे शाम कोन्नुर, सिद्धांत, COL चे फाउंडर योगेश, रोटरी क्लब पुणे लोकमान्य नगरच्या निशा पाटील उपस्थित होते. निशा पाटील यांनी तृतीयपंथीयांचे मनोबल वाढविले आणि त्यांना मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे उद्या मुंबई आणि नंतर इतर शहरातून देखील ट्रान्स कूक तृतीयपंथी कुकरी कॉम्पिटिशन होणार आहे. स्वत: विष्णु मनोहर हे पदार्थाची चव घेऊन  स्पर्धकांची निवड करणार आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिकच रुचकर होणार आहे.