प्रसिद्ध गायक केके यांचं कोलकाता येथे निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रसिद्ध गायक केके यांचं कोलकाता येथे निधन

कोलकाता, दि. १ जून - प्रसिद्ध गायक केके (कृष्णकुमार कुननाथ) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. एका मैफिलीत सुमारे तासभर गाऊन झाल्यावर केके आपल्या हॉटेलवर परतले तेव्हा त्यांनी तब्येत बिघडल्याची तक्रार केली.

त्यानंतर त्याला कोलकाता येथील सीएमआरआय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. केके यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत.

केके यांच्या निधनावर पंतप्रधान आणि देशातील अनेक मान्यवरांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटले की, 'प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या गाण्यांमध्ये अभिव्यक्तीची व्यापकता आहे. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.'

गायक केकेचे पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ होते. 23 ऑगस्ट 1968 रोजी हिंदू मल्याळी माता-पिता सी. एस. मेनन आणि कुनाथ कनकवल्ली यांच्या पोटी त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला.येथेच त्यांचे पालनपोषण झाले. ते माउंट सेंट मेरी स्कूल, दिल्लीचे माजी विद्यार्थी होते. दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. केकेने 1991 मध्ये त्यांची बालपणीची प्रेयसी ज्योतीशी लग्न केले. त्यांना एक मुलगा नकुल कृष्ण कुननाथ आणि एक मुलगी आहे.

केके यांनी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी केकेने वयाच्या ४ व्या वर्षी ११ भाषांमध्ये सुमारे ३५०० जिंगल्स गायल्या होत्या. विशेष म्हणजे केके यांनी कधीही संगीताचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही.