फेसबुकचा वापर करून श्रीलंकेतील सत्ता उलथवली फक्त ४ तरुणांनी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

फेसबुकचा वापर करून श्रीलंकेतील सत्ता उलथवली फक्त ४ तरुणांनी

कोलंबो, (प्रबोधन न्यूज) – श्रीलंकेत 9 जुलै रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ प्रचंड मोठा जनसमुदाय उसळला होता. यामागे फक्त 4 तरुण होते. ज्यात काही डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञ, नाटककार आणि काही पाद्रींचा समावेश होता. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून श्रीलंकेतील प्रत्येकापर्यंत पोहोचून ती गर्दी जमवली, जी संपूर्ण जगाने पाहिली. हे तरुण गेल्या 4-5 महिन्यांपासून सतत भेटत होते. एक रणनीती बनवत होते आणि फेसबुकवरून देशभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.

यातील पहिला तरुण चेहरा म्हणजे चामिरे देडवगे. ज्याचे फेसबुक खाते लोकांना आकर्षित करणारे अनेक व्हिडिओ आणि संदेशांनी भरलेले आहे. त्याची प्रत्येक पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. तो व्यवसायाने मार्केटिंगमॅन असून देशातील एका मोठ्या जाहिरात कंपनीत व्यवस्थापक आहे. व्यवसायाने मार्केटर पण आवडीने कार्यकर्ता आणि सध्याच्या परिस्थितीत राजकीय विश्लेषक, असं त्याने फेसबुकच्या बायोमध्ये लिहलं आहे. मार्च महिन्यापासून, त्याचे साथीदार कोलंबोच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या सभा घेतल्यानंतर काय करायचे याचा विचार करत होते. एप्रिलपासून त्यांनी मोहीम सुरू केली. 9 एप्रिल रोजी राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर काही हजार लोकांनी निदर्शने केली.

दुसरा तरुण आहे सत्या चरित अमरतुंगे, चळवळीचा दुसरा चेहरा. ज्याच्या फेसबुक अकाऊंटवर रॅली काढताना आणि गो गोटा होमचा नारा देताना दिसत आहे. त्याचे अकाऊंटही लोकांना आवाहन करणाऱ्या आणि व्हिडीओच्या माध्यमातून आंदोलनासाठी प्रबोधन करणाऱ्या पोस्ट्सने भरलेले आहे. तो कोलंबोपासून 20 किमी अंतरावर असलेल्या मोराटुआ येथे राहतो. तो चांगला संघटक आहे. सत्य चरित हा देखील व्यवसायाने मार्केटिंग व्यावसायिक आहे. देशभरातील 8 दशलक्ष फेसबुक वापरकर्त्यांना या चळवळीशी जोडण्याचे काम चमीरा देडवगे यांनी केले. या दोघांच्या पोस्ट काही क्षणात व्हायरल होतात.

श्रीलंकेतील आंदोलनाशी संबंधित चळवळीचा तिसरा तरुण चेहरा आहे रुवंती दी चिकेरा. ते नाटककार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. देशभरातील आणि विशेषत: कोलंबो आणि आजूबाजूच्या भागातील लोकांच्या घरी ते स्वयंसेवकांच्या माध्यमातून पोहोचले. याद्वारे त्यांनी आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवला. हे काम त्यांनी कुशलतेने केले. ते नाटककार असल्याने लोकांशी जोडण्यासाठी त्यांनी तीच पद्धत खूप वापरली. त्यांचे डायलॉग्ज लोकांना खूप आवडले. तेही गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकवर प्रचंड सक्रिय होते हे वेगळे सांगायला नको.

या आंदोलनामागील प्रमुख चेहऱ्यांपैकी हे चौथं नाव आहे. त्यांचे पूर्ण नाव अमिला जीवंत पेरिस आहे. व्यवसायाने कॅथोलिक धर्मगुरू. मात्र, यावेळी त्यांनी देशातील जनतेला जागृत करण्याच्या कामात सहभाग घेतला. जिथे त्यांनी या आंदोलनासाठी सर्व धार्मिक संघटनांना सोबत घेतले. त्याचवेळी सहकाऱ्यांसह त्यांनी थेट विरोधी पक्ष आणि विद्यार्थी महासंघांशी संपर्क साधला. अमिला फेसबुकवरही खूप सक्रिय आहे. तेथे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आणि आकर्षक पोस्ट्स मिळतील.

पाद्री जीवंत पॅरिस लोकांमध्ये गेले. छोट्या सभांनी त्यांना जागृत करण्याचं काम केलं. मात्र, या चार तरुणांनी आपल्या चळवळीत 9 अंकाला विशेष स्थान दिलं. 9 एप्रिलला पहिल्यांदा निदर्शनं झाली, तर 9 जूनला पुढच्या मोठ्या निदर्शनाद्वारे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा द्यावा, असा दबाव निर्माण झाला. त्यानंतर 9 जून रोजी प्रचंड जनसमुदाय जमल्यानंतर पुन्हा निदर्शने झाली, यावेळी बासिल राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. 9 जुलैची कामगिरी अभूतपूर्व होती. लंकेत एवढा मोठा जमाव कसा जमला हे अजूनही लोकांना समजलेले नाही.