राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलली, घरी परतले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, दि. १ जून - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची आज होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
बुधवारी राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी ते मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांच्या विविध वैद्यकीच तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत.
राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं असून त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, 1 जूनला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही.
मध्यंतरीच्या काळात टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. हीच दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार उद्या लिलावती रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडेल.