काँग्रेस नेते जीएस बाली यांचे निधन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
दिल्ली - हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जीएस बाली यांचे शुक्रवारी (दि.२९) मध्यरात्री निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आजारी असल्याने मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत होते, अखेर मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांचे पार्थिव दिल्लीहून कांगडा येथे नेण्यात येणार आहे.
जीएस बाली यांचे नाव गुरमुखसिंग बाली होते. नगरोटा बगवां विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले होते. जीएस बाली यांनी हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळात परिवहन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि तांत्रिक शिक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. बाली प्रथम 1998 मध्ये आमदार झाले. त्यानंतर 2003, 2007 आणि 2012 मध्ये त्यांना चौथ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. बाली यांना काँग्रेसने 6 मार्च 2003 रोजी परिवहन मंत्री बनवले होते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या अरुण कुमार यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.