CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

CRPF जवानाचा सहकाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

तीन जखमी, छत्तीसगडमधील सुकमा कॅम्पची घटना

सुकमा -

छत्तीसगडमध्ये सुकमा येथे रविवारी रात्री उशिरा CRPF (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानाने त्याच्या साथीदारांवर AK-47 ने गोळीबार केला. या घटनेत 4 जवानांचा मृत्यू झाला तर 3 जखमी झाले आहेत. दोन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना हेलिकॉप्टरमधून रायपूरला पाठवले जात आहे. घटनेनंतर आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

घटना कोंटा विकासखंड लिंगानापल्ली गावात असलेल्या 217 बटालियन कॅम्पची आहे. रात्री 3.15 च्या सुमारास सीआरपीएफ जवान रितेश रंजनने आपल्या साथीदारांवर गोळीबार केला. गोळी लागल्याने दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. या छावणीत 85 व्या बटालियनच्या सैनिकांचा देखील कॅम्प आहे. रात्री उशिरा झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली होती. इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

5 जखमी जवानांना छावणीपासून सुमारे 11 किमी दूर तेलंगणातील भद्राचलम येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ३ जवानांचा मृत्यू झाला, तर २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हेलिकॉप्टरमधून रायपूरला रेफर करण्यात येत आहे. परस्पर वैमनस्य किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने आरोपी जवानाने गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. एक दिवसापूर्वीही त्याचा सहकारी सैनिकांशी वाद झाला होता. आरोपी जवान अनेक दिवसांपासून अस्वस्थ होता.

मृत्युमुखी जवान हे बिहार आणि पश्चिम बंगालचे रहिवासी

या गोळीबारात मृत्युमुखी पडलेले दोन जवान बिहारचे, तर एक पश्चिम बंगालचा आहे. चौथ्या जवानाची माहिती अद्याप मिळालेली नाही. मृत जवानांमध्ये बिहार निवासी धनजी आणि राजमणी कुमार यादव आणि पच्छिम बंगाल निवासी राजीब मंडल असून या व्यतिरिक्त धर्मेंद्र कुमार या आणखी एका जवानाचा समावेश आहे. याशिवाय जवान धर्मेंद्र कुमार सिंग, धर्मात्मा कुमार आणि मलाया रंजन महाराणा जखमी झाले आहेत.