मी नाही, तुम्हीच आहात बहिरे ! चंद्रकांत खैरेंनी केला फडणवीसांवर प्रतिवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मी नाही, तुम्हीच आहात बहिरे ! चंद्रकांत खैरेंनी केला फडणवीसांवर प्रतिवार

औरंगाबाद, दि. 16 मे - शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली होती. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी तर संभाजीनगर बोलतो, मी संभाजीनगर म्हणतो म्हणजे झाले ना, त्यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. ओ खैरे व्हा आता बहिरे, असे म्हणत फडणवीसांनी खिल्ली उडवली होती.

भाजपच्या हिंदुत्वापासून बाबरी पडण्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी भाजप, फडणवीस आणि ‘आरएसएस’वर हल्ले चढविले होते. त्यावर उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमातील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. फडणवीस म्हणाले, औरंगाबादचा कायम झाला खसरा आणि भाजपचे सरकार येत नाही तोवर संभाजीनगर विसरा. कारण उद्धवजी म्हणाले असतील मॅडम आमचा पाठिंबा काढू नका, आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो. आता संभाजीनगरचा विषय विसरा.

आपल्याला व्हा बहिरे म्हटल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच संतापले आहेत. त्यांनीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर प्रतिवार केला आहे. किंबहुना त्यांच्या टोमण्यातील हवाच काढून घेतली आहे. खैरे म्हणतात, फडणवीस मलाच बहिरे म्हणताहेत. मात्र त्यांनी कित्येकवेळा सांगूनही संभाजीनगर नामांतराकडे दुर्लक्ष केलं. तेच बहिरे आहेत. त्यांचे इथले ज्येष्ठ नेते आधीच बहिरे आहेत. मला कशाला बोलता तुम्ही... अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्ष नेते तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरावरून फडणवीसांनी खैरेंवर टीका केली होती. खैरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकदा औरंगाबादच्या नामांतरासाठी भेटलो. तेव्हाच संभाजीनगर नामांतर का केले नाही?, असा प्रश्न खैरे यांनी करून शिवसेनेला श्रेय मिळू नये म्हणून शहराचे नामकरण भाजप सरकारच्या काळात झालं नाही, असा आरोप केला आहे. खूप पत्र लिहिली. त्या पत्रांची मोठी फाईलच आहे. बी टीमला (एमआयएमला) भाजप घाबरत असल्याने केंद्रात व राज्यात सत्ता असूनही भाजपने औरंगाबादचे नामांतर केले नाही, असे खैरे म्हणाले. नामांतरासाठी भेटायला गेलो की हो करू, असं गोड बोलायचे... त्यांना दरवेळेला भगवी शाल मी भेट द्यायचो. शंभरावर भगव्या शाली त्यांच्याकडे जमा झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.