आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई, दि. 16 मे - महाराष्ट्रातीलही नऊ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असल्याने पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून केरळसह मेघालय, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे.

उत्तरेकडील डोंगरी राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.

स्कायमेट व भारतीय हवामान विभागानेदेखील यंदा मान्सून जोरदार होण्याचा अंदाज वर्तवला आहे. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार 2021 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. तर भारतीय हवामान विभागानेही 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कमी-जास्त पावसाचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो, कारण मान्सूनच्या परिस्थितीवरुन दुष्काळ असेल की पूर येईल याचा अंदाज वर्तवला जातो. यंदा मान्सूनबाबत चांगले अंदाज आल्याने शेतकरी व एकंदरित देशाच्या आर्थिक स्थितीवरही यांचा चागंला परिणाम होण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलं. जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रात्री 12 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पीक हंगामात धान पिकांची लागवड केली असून धान पीक कापणीला आला आहे. धान पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.