ठाकरे गटाला आणखी एका आमदाराचा 'जय महाराष्ट्र'; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ठाकरे गटाला आणखी एका आमदाराचा 'जय महाराष्ट्र'; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात

      मुंबई , (प्रबोधन न्यूज )   -   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे  यांनी देखील ठाकरे गटाला  'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.

पहिल्या महिला उपसभापती नीलम गोऱ्हे

2002 ते 2008, 2008 ते 2014, 2004 ते आजपर्यंत विधानपरिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. जून 2019 मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानमंडळात तब्बल 55 वर्षानंतर विधानपरिषदेवर पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. नीलम गोऱ्हे यांना 2014 च्या युती सरकारच्या काळात मंत्री मिळेल अशा चर्चा होत्या परंतु त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती.

राजकारण्यात येण्यापूर्वी नीलम गोऱ्हे समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या त्या अध्यक्षा असून पुण्यात त्यांचं कार्यालय आहे. अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे.