‘किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ पाहणं म्हणजे….’, निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘किरीट सोमय्या यांचा तो व्हिडिओ पाहणं म्हणजे….’, निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया

मुंबई ,  (प्रबोधन न्यूज )  -  आज विधिमंडळात किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजला. याच विषयावरुन विरोधकांनी सभागृहात सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही वृत्त वाहिन्यांवर हा व्हिडिओ दाखवला जात आहे. किरीट सोमय्या यांचा मुद्दा गाजणार हे निश्चित होतं. आज विधिमंडळाच्या सभागृहात जोरदार पडसाद उमटले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची वरिष्ठ पातळीवरुन सखोल चौकशी होईल, असं जाहीर केलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि अनिल परब सभागृहात या कथित व्हिडिओवरुन आक्रमक झाले. “अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे” असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना काय चिंता वाटते, ते सांगितलं. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी जाहीर केली. पण एक अस्वस्थ करणारा मुद्दा आहे, तो म्हणजे दोन-तीन वाहिन्यांवर वारंवार हे शॉट्स दाखवले जात आहेत. मी विनंती करीन, हे सरकारने करावं अस म्हणणार नाही. आलेला व्हिडिओ ब्लर करता येतो., पण काय कृत्य चाललय ते वारंवार दाखवलं जातं. मला असं वाटतं व्हिडिओ दाखवताना थोडफार बंधन ठेवाव” असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.

कोण पाहणार हा व्हिडिओ?

“पोलीस तपास होईल, त्यावेळी वाहिन्यांनी माहिती गोपनीय स्वरुपात द्यावी, जेणेकरुन पीडित महिलेपर्यंत पोहोचण शक्य होईल. तुम्ही पेनड्राइव्ह दिला, तो बघणं म्हणजे खूप कठीण परिक्षा आहे. पण, मी महिला पोलिस अधिकारी, महिला डॉक्टर यांना तो व्हिडिओ बघायला सांगून त्यांचं मत घेईन. हे तपासून त्यातून निघणार काय आहे?” असा सवाल निलम गोऱ्ंहे यांनी उपस्थित केला.