पिंपरीतील चिमुकल्याच्या खुनाचे रहस्य उलगडले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरीतील चिमुकल्याच्या खुनाचे रहस्य उलगडले

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

चिमुकल्याचा खून सेक्सच्या हव्यासापोटी

पिंपरी-चिंचवड, दि. १९ एप्रिल – चिखली येथे आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने खुनाचे गूढ उकलले आहे. आरोपीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न मुलावर केला होता. ते उघडकीस येऊ नये म्हणून त्याने हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. लक्ष्मण देवासी (वय 8, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर आरोपीचे नाव पोलिसांनी अद्याप जाहीर केले नाही. तपासाअंती नाव जाहीर करणार असल्याचे समजते. आरोपी हा परराज्यातील असल्याचे समजते.

देवासी याच्या घराजवळ राहणाऱ्या आणि चार दिवसांपूर्वी परिसर सोडून गेलेल्या एकाने देवासी याला पडक्या जागेत नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने त्यास विरोध केला. लक्ष्मण हा घरी जाऊन सांगेल व आपल्यावर गुन्हा दाखल होईल, या भितीतून त्या आरोपीने लक्ष्मण याचा दगडाने ठेचून खून केला. रविवारी दुपारी देवासी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आई-वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात दिली. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लक्ष्मण याचा खून झाल्याचे उघडकीस आले.

लक्ष्मण याच्या खुनाची माहिती मिळताच समाजबांधव नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. सोमवारी देखील आंदोलन सुरूच ठेवले होते. जोपर्यंत आरोपीला शोधून अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात न घेता चिखली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या माडंला होता.

दरम्यान आरोपी हा काही दिवसांपूर्वीच हा परिसर सोडून गेला होता. तो पुन्हा परिसरात कशासाठी आला, असा संशय पोलिसांना आल्याने गुंडा विरोधी पथकाने त्याच्यावरच लक्ष केंद्रीत केले होते. तसेच चिखली पोलीस दुपारी बारा वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. मात्र आरोपीने साडेअकरा वाजण्यापूर्वीच लक्ष्मणचा खून केला होता. त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने खुनाची कबुली दिली.

दरम्यान, चिखली पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतरही काहीच माहिती मिळत नव्हती. दरम्यान संशयितांची चौकशी करण्यासाठी गुंडा विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान एका आरोपीने खूनाची कबुली दिली. आरोपींनी दिलेली माहिती पडताळून पाहण्याचे काम पोलीस करीत आहेत.