भारतीय जैन संघटना विद्यालयात रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. १९ एप्रिल - सन २००२-२००३ च्या इ. १० वीच्या बॅचने भारतीय जैन संघटना प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, पिंपरी येथे या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. तब्बल १८ वर्षानंतर वेगवेगळ्या ठिकाणांवरून माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते.
प्रथमत: मान्यवर शिक्षक, प्राचार्य प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दिलीपकुमार देशमुख होते. या वेळी सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. माजी विद्यार्थी अमित हांडे, निलेश अष्टेकर, तुषार देशमुख, अपर्णा कुमठेकर, दीपक कुंभार, अमित गंधी, सुप्रिया फेंगसे, अश्विनी शिवतारे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयाविषयीच्या व शिक्षकांविषयीच्या आठवणी सांगितल्या.
शिक्षकांच्या वतीने भारतीय जैन संघटना विद्यालयाचे माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. संपत गर्जे, माजी शिक्षक रघुनाथ ढेकळे, प्रा. विनया तिखे, अनुराधा घुले व उपमुख्याध्यापक राजेंद्र कोकणे आदिंनी मनोगते व्यक्त केली व विद्यार्थ्यांविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रमुख अतिथी प्राचार्य दिलीपकुमार देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यालयाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी असेच प्रयत्न करावेत असा मौलिक सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतामध्ये मुख्याध्यापक संजय जाधव म्हणाले की, विविध क्षेत्रात विद्यार्थी मोठ्या पदावर विराजमान झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो.
याप्रसंगी या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेट म्हणून सुमारे ५४०००/- रु. किंमतीची सुमारे आठ कपाटे दिली.
यावेळी प्रा. दिलीप सुर्वे, रेखा छाबडा, गजानन वाढे, चंद्रकांत घोडके, लाला गिरी, वामन भरगंडे, शीतल परब, सुनिता पांडकर, दीपिका सावंत, निवेदिता देशमुख, शैला बर्वे, स्नेहलता वाडेकर, विलास गुंजाळ, मधुकर जगताप, संजय कवितके, राजेंद्र लोखंडे इ. शिक्षक उपस्थित होते. तर माजी विद्यार्थी स्मिता पवार, आरती काटे, माधुरी मोहिते, रसिका पिसे, प्रज्ञा कोरे, वृषाली फाळके, तृप्ती ससाने, नवनाथ जैद, संदीप सपाट, भूषण पोटावडे, किशोर कारंडे, मोहन आरबुज, सचिन पाटील, चंद्रशेखर जमदाडे, सोमनाथ नर्हे, स्वप्नील वाघ, अनिकेत माळवदकर, रोहित घनवट, ललित काळोखे, संजय गोरे, नीलेश मलातपुरे, गुरुनाथ शिनगारे, अभिजीत हुलसूरकर आदि उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित हांडे, निलेश अष्टेकर, संजय गोरे, अश्विनी शिवतरे, अपर्णा कुमठेकर यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा कुमठेकर, प्रास्ताविक माधुरी मोहिते तर आभार प्रदर्शन रूपाली दिवेकर यांनी केले.