नाना काटे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांच्या सोमंवारी सभा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
जयंत पाटील, भास्कर जाधव, धनंजय मुंडे यांच्या तोफा धडाडणार
पिंपरी, दि. 19 : चिंचवडची पोटनिवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचत असतानाच महाविकास आघाडीने आपले स्टार प्रचारक मैदानात उतरविले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री भास्कर जाधव व धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपातळीवर या नेत्यांची सभा उद्या सोमवारी (दि. 20) विमल गार्डन, रहाटणी येथे होणार आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने विठ्ठल उर्फ नाना काटे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. पहिल्या टप्प्यात नाना काटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रचाराच्या दुसर्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आणखी गती देतानाच काटे यांना विजयी करायचेच या इर्षेने महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाकडून लोकशाही यंत्रणेलाच गालबोट लावण्याचा होत असलेला प्रकार, चिंचवड विधानसभेतील पाण्याचा प्रश्न आणि महापालिकेत भाजप नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे या निवडणुकीत नाना काटे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अभ्यास नेते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव हे अत्यंत आक्रमक आणि फर्डे वक्ते म्हणून ओळखले जातात. तर धनंजय मुंडे यांचा ओबीसी मतदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे या तीनही नेत्यांची आज होणारी सभा जंगी होणार आहे. या सभेला अनेक मान्यवर, महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. वरील तीन नेते भाजपच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्याची शक्यता असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.