म्हाडाच्या कार्यालयात उबाठा शिवसैनिकांचा राडा; परबांनी दिली सोमय्यांना धमकी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

म्हाडाच्या कार्यालयात उबाठा शिवसैनिकांचा राडा; परबांनी दिली सोमय्यांना धमकी
म्हाडाच्या कार्यालयात उबाठा शिवसैनिकांचा राडा; परबांनी दिली सोमय्यांना धमकी

मुंबई (प्रबोधन वृत्तसेवा) - माजी मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचं वांद्रेतील म्हाडाच्या इमारतीतील कार्यालय पाडण्यात आले. शिवसैनिक संतापलेल्या शिवसैनिकांनी आता थेट म्हाडाच्या कार्यालयावर धडक दिली आहे. घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त करताना दिसत आहे. तर अनिल परब हेदेखील म्हाडाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. म्हाडाच्या कार्यालयाबाहेर शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केल्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता आहे. याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. म्हाडा ऑफिसच्या परिसरातील कार्यकर्त्यांचा मोठा जमाव आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होताना दिसली.

गेल्या अडीच वर्षांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे नेते अनिल परब आज रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. वांद्रे परिसरातील गांधीनगर येथील म्हाडा इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून कार्यालय सुरू केल्याची तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार किरीट सोमय्यांनी केली होती. या प्रकरणावरून आता परब सोमय्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे.

हे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या याठिकाणी पाहणीसाठी येणार होते. या मुद्द्यावरुन अनिल परब यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. स्वत: अनिल परब यांनी समोर येत किरीट सोमय्या यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. किरीट सोमय्या यांनी याठिकाणी येऊनच दाखवावे. शिवसैनिक त्यांचा योग्य तो पाहुणचार करतील, असे आवाहन अनिल परब यांनी दिले.

यावेळी अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. अनिल परब निवडक कार्यकर्त्यांसह म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी आतमध्ये गेले. यावेळी कार्यकर्त्यांनी शांत राहावे, असे त्यांनी म्हटले. मात्र, पोलिसांनीही कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करु नये. अन्यथा पुढील परिस्थितीला मी जबाबदार राहणार नाही, असे परब यांनी म्हटले.

दरम्यान, या प्रकरणावर बोलताना भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, मुळात अनधिकृत बांधकाम केल्यानंतर ते मी तोडलं की, म्हाडाने तोडलं, याच्या नावावरून गोंधळ घालणं म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे. मुळात अनधिकृत बांधकाम करायलाच नको होतं.

अतुल भातखळकर पुढे असंही म्हणाले की, खरंतर अनधिकृत बांधकाम केलं, याबद्दल अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे, ही आमची पुढची मागणी आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाब होता असं त्यांना वाटतं असेल, तर ते उच्च न्यायालयात का गेले नाही. वरच्या कोर्टात ते जाऊ शकले असते.

अनिल परब यांच्या वक्तव्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. कारण त्यांनी हेही सांगितलं की, मी रिसॉर्ट बांधलं नाही. ती जमीन माझी नव्हती. आम्ही सगळी कागदपत्रं सादर केली होती. अनिल परब यांच्या वक्तव्याला कुणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माध्यमांशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, आमची मागणी फक्त इतकी आहे की म्हाडाची जी लेआऊट आहे ती आजची नाही. मग तुम्ही आजच हे का करत आहात? लोकांना न्याय दिला गेला पाहिजे. या राज्यात किरीट सोमय्यांसारखे दलाल मोदी सरकारने नेमले आहेत. आजपर्यंत ईडीच्या कारवाया इतक्या लोकांवर होत होत्या. मात्र भाजपसोबत गेल्यावर कारवाई का होत नाही? भाजपमध्ये गेल्यावर ते सगळे पवित्र होतात का? असा प्रश्न इथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तसेच, अनिल परब हे तळागाळातले नेते असून ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत त्यामुळेच त्यांना त्रास दिला जातोय. पाडकाम किरीट सोमय्यांमुळेच झाले आहे. त्यामुळे आम्ही याबाबत जाब विचारणारच. आजपर्यंत किरीट सोमय्या नारायण राणेंच्या विरोधात बोलत होते ते आज का बोलत नाहीत? त्यांना अनिल परब यांना फोडण्यासाठी हा दबाव निर्माण करायचा आहे, असा आरोपही या कार्यकर्त्यांनी केलेला आहे.