चिखलीत ८ वर्षीय मुलाची क्रूर हत्या
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. १८ एप्रिल - पिंपरी-चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. लक्ष्मण देवासी (हरगुडे वस्ती, नेवाळे वस्ती, चिखली) असं हत्या झालेल्या आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. त्याचा मृतदेह घराच्या शंभर मीटर अंतरावर सापडला आहे. या प्रकरणी एका संशयिताला चिखली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मण देवासी मुळचा राजस्थानी असून, त्याला चार बहिणी आहेत. लक्ष्मणच्या वडिलांचे किरणा मालाचे दुकान असून त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा आठ वर्षीय मुलगा रविवारी दुपारपासून बेपत्ता झाला. त्याचा आई वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री सातच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा, त्याच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका मोडक्या पत्र्याच्या शेडमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा गट्टू घालून खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मारवाडी समाजाच्या जवळपास एक हजार लोकांनी एकत्र येऊन लक्ष्मणचा खून करणाऱ्याला ताबडतोब अटक करावी अशी मागणी केली नाही. जो पर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत लक्ष्मणचे पार्थीवावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. वायसीएम रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाले आहे. मात्र ते शव ताब्यात घेण्यास लक्ष्मणच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या घटनेमुळे चिखली परिसरात खळबळ माजली आहे. चिखली परिसर हा मुळातच अतिशय संवेदनशिल मानला जातो. या भागात नेहमीच अप्रिय घटना घडत असतात. चोरी, लूटमार, छेडछाड, गुंडागिरी, खंडणी या सारखे गुन्हे या परिसरात नेहमी घडत असतात. या पूर्वी ३१ मार्चला रात्री पाऊणे नऊ वाजता चिखली मधील गणेश हाऊसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्तीमधील पीसीएमसी फॅशन रेडिमेड कपड्याच्या दुकानावर अज्ञात चार गुंडांनी कुसुमताई नागरगोजे यांच्यावर कोयत्याने हल्ला करून पसार झाले होते. त्या गुन्हेगारांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही.