अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतले मोरया गोसावींचे दर्शन

मंदार देव महाराज आणि आरएसएसच्या प्रमुखांचेही घेतले आशिर्वाद

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप,  बाळासाहेबांची शिवसेना,  आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रविवारी चिंचवडमध्ये मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच मंगलमूर्ती वाड्यात जाऊन चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ देव महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंचवड येथील कार्यालयात जाऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. २६ फेब्रुवारीला मतदान आणि २ मार्चला मतमोजणी आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. त्या भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम युतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रविवारी अश्विनी जगताप यांनी भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि माजी नगरसेवक, नगरसेविका यांच्या समवेत  चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मंगलमूर्ती वाड्यात जाऊन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ महाराज देव यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी लक्ष्मणभाऊ जगताप यांचा मुलगा आदित्य जगताप,  माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे,  माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,  प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी,  प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,  माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे,  करूणा चिंचवडे,  माधवी राजापुरे,  माजी नगरसेवक सुरेश भोईर,  भाजपचे सरचिटणीस राजू दुर्गे,  महिला आघाडी शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे,  प्रदेश सदस्य अनुप मोरे,  शेखर चिंचवडे, नवीन लायगुडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 

त्यानंतर अश्विनी जगताप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिंचवड येथील भार्गव सदनमधील मुख्य कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे,  उमेश कुटे यांच्यासोबत चर्चा केली. तसेच त्यांनी संघाचे प्रांत पदाधिकारी प्रकाशराव मीठभाकरे आणि हेमंतराव हरारे यांचीही भेट घेत आशिर्वाद घेतले.