पालकमंत्री अजित पवार उद्या पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पालकमंत्री अजित पवार उद्या पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर

पिंपरी-चिंचवड, दि. 2 जून - उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांची भूमीपूजने आणि उद्घाटने त्यांच्या हस्ते होणार आहेत. सकाळी साडेसातपासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची उद्घाटने दीड महिन्यापूर्वी अजित पवार यांच्या हस्ते होणार होती. परंतु, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे अजितदादांनी उद्घाटने रद्द करुन थेट रुग्णालय गाठत जगताप यांची भेट घेतली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने उद्या विविध विकासकामांची उदघाटने, भूमीपूजने ठेवली आहेत.

महापालिका मुख्यालयातील उद्योग सुविधा कक्ष, सीएसआर सेलचे उद्घाटन, पोलिसांना पेट्रोलिंगकरिता 50 स्मार्ट बाईकचे हस्तांतरण,ग्रीन मार्शल पथकाकरिता हॅण्ड हेल्ड डिव्हाईसचे वाटप, 6 फायर मोटार सायकल्स अग्निशामक विभागाला अजित पवार यांच्या हस्ते दिल्या जाणार आहेत. सकाळी साडेसात ते सव्वाआठ या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत.

साडेआठ वाजता सीएमई येथील रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन व पाहणी करणार आहेत. सव्वानऊ वाजता भोसरीतील सखुबाई गवळी उद्यानातील बहुमजली वाहनतळाचे भूमिपूजन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. पावणेदहा वाजता नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील हॉकी अॅकडमीचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सव्वादहा वाजता अजितदादा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देणार असून पाहणी करणार आहेत. पावणेअकरा वाजता तळवडे जॉगिंग ट्रॅक, उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत. तेथून सव्वाअकरा वाजता भक्ती-शक्ती येथील इको ट्रॅकचे भूमीपूजन करणार आहेत.

पावणेबारा वाजता थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमी येथील पॅव्हॅलीनचे उदघाटनही अजितदादा करणार आहेत. त्यानंतर एक वाजता वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे उद्घाटन, पिंपळे सौदागर कुणाल आयकॉन रोड अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे उद्घाटन तसेच पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाच्या भूमीपूजनानंतर प्रशासकीय कार्यक्रमांची सांगता होणार आहे.