‘खंडणीखोर सचिन वाझे, परमबीर यांनी अनिल देशमुखांना फसवलं !' नवाब मलिक यांचा मोठा दावा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

‘खंडणीखोर सचिन वाझे, परमबीर यांनी अनिल देशमुखांना फसवलं !' नवाब मलिक यांचा मोठा दावा
मुंबई -
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच भाजपच्या मदतीने देशमुख यांच्याविरोधात इमेलद्वारे तक्रार करण्यात आली, असा आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मलिक पुढे म्हणाले की, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी मुंबईमध्ये खंडणीचा धंदा सुरु केला होता. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटीलियासमोर बॉम्ब ठेवण्यात आला. हे काम सरकारला अंधारात ठेवून केले गेले. विधानसभेत जेव्हा प्रश्न आला तेव्हादेखील मुंबई आयुक्तांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली. सगळी माहिती समोर आल्यानंतर आयुक्ताची बदली करण्यात आली, असा दावा मलिक यांनी केला.
यावेळी नवाब मलिक यांनी भाजपवरदेखील गंभीर आरोप केला. “बदलीनंतर हे प्रकरण पुढे जाईल आणि तपास सुरु होईल हे कळल्यानंतर भाजपच्या मदतीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर काही लोकांनी सीबीआयमार्फत याचा एफआयआर दाखल करुन घेतला. एफआयआर दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुम्ही कितीही आम्हाला त्रास द्या. जे काही तुम्ही करत आहात, त्याचे उत्तर आम्ही देऊ, असे सांगितले आहे,"असे स्पष्ट करतानाच देशमुख यांना अडकविण्यासाठी फर्जीवाडा करण्यात आला. जो तक्रारदार आहे, तोच आता फरार झालेला आहे. हे लोक पाहत आहेत. आज ना उद्या यातील सत्यता कोर्टाच्या समोर येईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.