वसंत मोरेंसाठी शिवसेनेच्या पायघड्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वसंत मोरेंसाठी शिवसेनेच्या पायघड्या

पुणे, दि. 8 एप्रिल – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मशिदीवरील भोंग्यांना विरोध करा असा मनसे सैनिकांना आदेश दिला. हा आदेश  वसंत मोरे यांनी साफ धुडकावला व राज ठाकरे यांच्या नाराजीला सामोरे गेले. आपण आपल्या वॉर्डात सलोखा ठेवणार असून, मशीदीवरील भोंग्याला विरोध करणार नसल्याचे व भोंग्याला विरोध म्हणून स्पीकरवरून हनुमान चालिसा लावणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पक्षाचा आदेश धुडकावला म्हणून राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली.

विशेष म्हणजे मोरे यांनी त्यावरून त्रागा वा नाराजी व्यक्त न करता नवीन शहराध्यक्षाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून पक्षात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वसंत मोरे यांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले, असे खुद्द वसंत मोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. मात्र त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. या पुढील काळात वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन इतर पक्षात प्रवेश करतात की मनसेत राहून काम करत राहणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.